मुंबई : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सकाळी ९:१० पर्यंतचं निकालाचं अपडेट हाती आलं तेव्हा, भाजप पाचही राज्यात पिछाडीवर आहे. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. सुरूवातीला फक्त राजस्थानमध्ये काँग्रेस आघाडीवर होतं. राजस्थानात काँग्रेस विजयाच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे. पण यानंतर जवळजवळ पाचही राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर आल्याचं चित्र आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसची अटीतटीची लढत आहे. मिझोराममध्ये देखील भाजपला अजून एकही जागा मिळालेली नाही.
निकाल LIVE पाहा http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा.
हे चित्र शेवटपर्यंत कायम राहिली तर, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. काँग्रेसच्या बाजूने पाचही राज्यात कौल आल्यानंतर, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
तेलंगणात भाजपला केवळ ४ जागांवर आघाडी आहे. हे निकाल भाजपसाठी धक्कादायक मानले जात आहेत. भाजप आता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढील कोणती रणनीती आखेल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.