यंदाच्या वर्षी असं असेल पर्जन्यमान; शेतकरी वर्गाने जरुर वाचा

यंदाच्या वर्षीचा मान्सून हा.... 

Updated: Apr 15, 2020, 02:07 PM IST
यंदाच्या वर्षी असं असेल पर्जन्यमान; शेतकरी वर्गाने जरुर वाचा  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असतानाच अनेक ठिकाणी ऋतुचक्रामध्ये होणारा बदलही सर्वांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. तापमानामध्ये होणारा बदल आणि अनेक ठिकाणी सुरु असणारा अवकाळी पाऊऩ या सर्व वातावरणात २०२० या वर्षासाठीच्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

यंदाच्या वर्षीचा मान्सून हा अतिशय सर्वसामान्य प्रमाणात असणार आहे. शिवाय २०२० या वर्षात ऐन पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जवळपास १०० टक्के पर्जन्यमान असणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Ministry of Earth Sciences (MoES)चे सचिव माधवन राजीवन यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. 

गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पाऊस आणि गारपीटीचा सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा मान्सून बळीराजासाठी सुखावह असणार अशीच चिन्हं तूर्तास वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन लक्षात येत आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचं चित्र अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवल्यानंतर कृषी मंत्रालयाकडून गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे Kharif National Conferenceचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये येत्या काळातील पेरणीसाठीचं मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.