नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक केलंय का?, ते लिंक केलं नसेल तर आजच करुन घ्या. कारण पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
पॅन आणि आधार लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकते. याआधी सरकारनं पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. यानंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी आधार संदर्भात सुप्रीम कोर्टानं निकाल दिला होता.
'खाजगी आयुष्य' हा मूलभूत अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. त्यामुळे आधारची सक्ती करताना सरकारला विचार करावा लागणार आहे. मात्र कोर्टाच्या निर्णयात पॅन आणि आधारच्या लिंक संदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळं तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करावंच लागणार आहे.
आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे आपल्याला पॅन कार्ड पुन्हा बनवावे लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही. त्याचबरोबर जर तुम्ही आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही, तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो.