मुंबई : आमदार राजेंद्र राऊत यांनी 29 मे ला एका कार्यकर्त्याला श्रीमुखात भडकावली होती. क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेदरम्यान हा कार्यकर्ता स्टेजवर आमदार राऊत यांच्या पाया पडला. पाया पडल्यानंतर वर मान करताच राऊत यांनी मुस्काटात लावून दिली. त्यानंतर आता आणखी एका आमदाराने असाच प्रताप केला आहे. मतदारसंघातील समस्या सांगितल्याने आमदाराने डोक्यात वीट घातल्याचा आरोप नागरिकाने केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सपास सुरु आहे. (aam aadmi party mla akhilesh pati tripathi angry on person due to man complaint regarding sewage at delhi)
मिळालेल्या माहितीनुसार, आमदाराने आपल्याला मारहाण केली. तसेच जीवघेणा हल्ला केला, असा आरोप गुड्डू हलवाई या व्यक्तीने केला. या प्रकरणी पोलिसांनी या आमदारावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर हा सर्व राजकीय स्टंट आहे.
गुड्डू यांच्यावर कोणत्याच प्रकारे हल्ला करण्यात आलेला नाही, अशी प्रतिक्रिया आमदाराच्या पत्नीने दिली. हा सर्व प्रकार दिल्लीत घडला आहे. मॉडल टाऊन विधानसभा मतदारसंघाचे आमदार अखिलेश पति त्रिपाठी (Akhilesh Pati Tripathi) यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती ही टेक्सट मेसेजद्वारे मिळाली. सदर घटनेची माहिती बुधवारी 6 जुलैला साडे चार वाजता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तिथे गुड्डू हलवाई आणि मुकेश बाबू भेटले. पोलीस या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. "मी जेलरवाला बाग जवळ एका कार्यक्रमात कॅटरिंगचं काम करत होतो", असा जबाब हलवाईने दिला.
"मी आमदार त्रिपाठींना भेटलो. त्यांना गटाराबाबतची समस्या सांगितली. त्यामुळे आमदार संतापले आणि त्यांनी मला विटेचा तुकडा फेकून मारला. हा सर्व प्रकार पाहून माझा मित्र महेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्यासोहत तोही जखमी झाला", अशी माहिती गुड्डुने दिली.
"गुड्डुच्याच्या कपाळाच्या डाव्या बाजूला जखम झाली आहे. तर महेशच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नाहीत. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत", अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणात नक्की काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.