मुंबई : Holcim ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अदानी समूहाच्या या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे.
उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे 'सिमेंट किंग' होणार आहेत. त्यांच्या अदानी समूहाने देशातील दोन मोठ्या सिमेंट कंपन्या एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स खरेदी केल्या आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी कुटुंबाने एक स्पेशल ऑफशोर कंपनी (SPV)बनवून एसीसी आणि अंबुजा सिमेटमध्ये स्वित्झर्लंडस्थित सिमेंट कंपनी Holcim Ltd चे भागभांडवल खरेदी केले आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये निश्चित करार झाला असून यासोबतच अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही उतरणार आहे.
Holcim आणि त्याच्या उपकंपन्यांची अंबुजा सिमेंटमध्ये 63.19% आणि ACC मध्ये 54.53% हिस्सा आहे.
अदानी समूहाने दोन्ही कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकसाठी 10.5 बिलियन डॉलर (सुमारे 81,360 कोटी रुपये) चा करार केला आहे. पायाभूत सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील हा देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.
Holcim ग्रुपच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. हॉल्सिम ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे.
अदानी समूहाच्या या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे. अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत. तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 31 दशलक्ष टन आहे.
शेअर बाजार गुंतवणूकदारांना अदानी यांच्या या सर्वात मोठ्या डील बाबत बातमी कळाल्यानंतर एसीसी आणि अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये सोमवारच्या सत्रात मोठी उसळी पाहायला मिळाली.