Earthquake In India: काही दिवसांपूर्वी तुर्की आणि आता ताजिकिस्तानमध्ये आलेल्या भूकंपानंतर पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे (Tajikistan Turkey earthquake). तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपात आतापर्यंत तब्बल 45 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू ओढावला. अशा या संकटाची चाहूल, अर्थात या भूकंपाची भविष्यवाणी डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) यांनी केली होती.
तुर्कीतील भूकंपाचे परिणाम आता थेट चीन आणि ताजिकिस्तानपर्यंत येऊन पोहोचले आहेत. गुरुवारी चीनमधील शिंजियांग (Xinjiang) आणि पूर्व तिजिकिस्तानला (Eastern Tajikistan) 7.3 आणि 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपानं हादरा दिला. ज्यानंतर आता भारतातही भूकंप येणाच्या त्यांच्या भविष्यवाणीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
हल्लीच एका नव्या व्हिडीओमध्ये त्यांनी भारतीय उपखंडामध्ये लवकरच प्रचंड तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो असं स्पष्ट केलं आहे. या भूकंपाचे परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये दिसून येतील. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 26 लाख नेटिझन्सनी पाहिला आहे. दरम्यान या व्हिडीओवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांच्या मते हूगरबीट्स यांचा हा दावा चुकीचा आहे.
Let me be clear: the purple bands do NOT indicate a potential rupture zone (sic). They mark regions at the time of atmospheric fluctuations relative to the Sun and a larger tremor may occur in or near that band. I explained this multiple times in videos. No room for wild ideas. https://t.co/3kTM6x9p9M
— Frank Hoogerbeets (@hogrbe) February 8, 2023
युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार अद्यापही कोणत्याही भूकंपाचे अधिकृत संकेत देण्यात आलेलेल नाही. त्यामुळं तूर्तात इतर दाव्यांवर विश्वास ठेवू नये असं म्हणताता ही माहिती कोणत्याही वैज्ञानिक संदर्भांवर आधारलेली नाही असंही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
फ्रँक हूगरबीट्स हे एक डच संशोधक आणि अभ्यासक आहेत. सोलर सिस्टम ज्योमेट्री सर्व्हेमध्ये (SSGEOS) ते रिसर्चर आणि डेव्हलपर अशी जबाबदारी सांभाळतात. आतापर्यंत त्यांनी भूकंपांविषयी बऱ्याचदा भविष्यवाणी केली असून, हा अंदाज SSGEOS संस्थेअंतर्गत वर्तवण्यात आला आहे.