Farmers Protest: दिल्लीच्या '५ पॉईंट'वर आंदोलन, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

दिल्ली चलो ऐवजी दिल्ली घेरो अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्यायत. 

Updated: Nov 30, 2020, 08:35 AM IST
Farmers Protest: दिल्लीच्या '५ पॉईंट'वर आंदोलन, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा  title=

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरुच आहेत. रस्त्यांवर असलेले ट्रॅक्टर हेच शेतकऱ्यांचे घर बनलंय. दिल्ली-उत्तर प्रदेश बॉर्डरवर शेतकऱ्यांनी रात्रभर देशभक्तीची गाणी गायली. दिल्ली चलो ऐवजी दिल्ली घेरो अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्यायत. 

शेतकरी आंदोलनाच्या पाचव्या दिवसानंतरही शेतकरी आंदोलनाचा वेग कमी झाला नाहीय. सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार आहे पण दिल्ली बॉर्डरवर चर्चा व्हावी यावर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या आंदोलनस्थळी जात नाहीयत आणि दिल्ली सीमेवरून हटतानाही दिसत नाहीयत. यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यायत. 

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी 

allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560">

 

दिल्ली-यूपी बॉर्डर (Delhi UP Border)  म्हणजे गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हेच आपले घर बनवलंय. थंडीपासून वाचण्यासाठी चादर, ब्लॅंकेट देखील आणले आहेत. 

आंदोलनासाठी बुराडी येथे न जाता दिल्लीच्या ५ पॉईंट येथे आंदोलन केलं जाईल असे रविवारी शेतकरी संघटनेच्या मिटींगमध्ये ठरलं. सरकारने विनाअट आमच्याशी बोलावं आणि रामलीला मैदान किंवा जंतरमंतर येथे आंदोलनाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 

पुढच्या ४ महिन्यांपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. गरज पडली तर आम्ही ४ महिने आंदोलन करु इतकी तयारी असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलंय. यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यायत. 

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Agricultural law) शेतकऱ्यांनी आंदोलन ( Farmers Protest) सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी  (farmers) आक्रमक झालेत. पंजाब, हरियाणा या राज्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी  (farmer) दिल्लीकडे रवाना झाले होते. त्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आले. पोलिसांकडून  (Police) आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत अश्रुधुराचा वापर केला. मात्र, शेतकरी झुकले नाहीत. त्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. अखेर पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला. 

दिल्लीच्या पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाला परवानगी दिलीय. तसचं निरंकारी समागम मैदानात आंदोलनाची परवानगी ही दिली. मात्र दिल्लीत इतरत्र कुठेही शेतकऱ्यांना आंदोलन करता येणार नाही असं ही पोलिसांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यासाठी पंजाब हरियाणामधून मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते.
 
कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी कृषी कायद्याला विरोध करत आहेत. आपले आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी चलो दिल्लीचा नारा शेतकऱ्यांनी दिला. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यात आले होते. प्रचंड पोलीस फौजफाटा महार्गावर तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.