मुंबई : एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. खरंतर राजस्थानच्या बाडमेरमधून जावई आणि सासूचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. खरंतर प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. प्रकरण बाडमेर-रामसर रस्त्यालगत असलेल्या गावातील आहे. मंगळवारी सकाळी गावातील लोकांनी तेथून जाताना दोन मृतदेह झाडाला लटकलेले दिसले तेव्हा ही घटना उघडकीस आली.
खरंतर जेव्हा गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेले पाहिले, तेव्हा गावकऱ्यांनी दोघांना ओळखले आणि पोलिसांना याबद्दल कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवून बारमेर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला.
होताराम (22) आणि दर्या देवी (38) अशी या मृतांची ओळख सांगण्यात आली, कैरव यांच्या सासू आणि सून असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी होतारामचा विवाह खरंटीया गावातील दरियादेवीच्या मुलीशी झाला होता. मात्र याच दरम्यान सासू आणि सून यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. लोकांनाही याची जाणीव होती. या लाजेपोटी दोघांनीही मृत्यूचा मार्ग निवडला.
दोघेही रेशन खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले.
ग्रामीण पोलीस अधिकारी परबत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गावातील एका झाडाला दोन लोकांचे मृतदेह लटकले असल्याची माहिती मिळाली. तत्काळ काही पोलिसांना तेथे पाठवण्यात आले.
मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. नातेवाईक येताच मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात दिला जाईल. या प्रकरणी अद्याप कोणताही अहवाल आलेला नाही.