Pasoori चं अनोखं व्हर्जन झालं व्हायरल, Video पाहून नेटकरी हसू आवरू शकले नाही

सध्या पसूरी गाण खुप चर्चेत आहे.

Updated: Jun 24, 2022, 08:53 PM IST
Pasoori चं अनोखं व्हर्जन झालं व्हायरल, Video पाहून नेटकरी हसू आवरू शकले नाही  title=

मुंबई : सध्या पसूरी गाण खुप चर्चेत आहे. ज्याच्या त्याच्या ओठावर हे गाण आहे, मोबाईल, लॅपटॉप,युट्यूब, इन्टाग्राममध्येच हेच गाण वाजताना दिसतय. या गाण्यावर अनेकांनी रील्स देखील बनवल्या आहेत. यातील काही नेटकऱ्यांनी हे गाण तर खूपचं उत्कृष्ट गायले,तर काहींनी मात्र हे गाण गाऊन नागरीकांना लोट पोट हसवले आहे. अशाच एका नेटकऱ्याचा आता व्हिडिओ व्हायरल होत आहे.   

'कोक स्टुडिओ'च्या 14व्या सीझनमधील 'पसूरी' हे लोकप्रिय गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. हे गाणे पाकिस्तानी गायक अली सेठी आणि शे गिल यांनी गायलेय. या गाण्याने अक्षरश भारताला वेड लावले आहे. 

पसूरी गाण्याप्रमाणेच असंख्य म्यूझिक लव्हर हे गाणे गाण्याचा प्रयत्न करतायत. इन्स्टाग्राम अनेक य़ुझर्स असे स्वत:चे व्हिडिओ बनवून पोस्ट करतायत. मात्र एका य़ुझरने 'पसुरी' गायले तेव्हा बघणारे हसत सुटले. कारण सगळ्यांनाच गाण्याचे बोल नीट माहीत नसतात आणि ते सुराने काहीही म्हणत जातात. असेच या तरूणासोबत घडले आहे. काही यूजर्स या तरुणाच्या आत्मविश्वासाचे कौतुकही करत आहेत. 

या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की एक माणूस त्याच्या घरात आहे. कॅमेराकडे बघत तो जोरात 'पसुरी' गाऊ लागतो. तो गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी गातो, पण हळूहळू त्याचे शब्द आणि गाण्याचे मूळ बोल यांचा मेळ चुकू लागतो. पण मुलाचा आत्मविश्वास दुणावत नाही. तो उत्साहाने गात राहतो. 

 

 हा व्हिडिओ 21 जून रोजी mallu.viral या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला होता. आत्तापर्यंत या क्लिपला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज आणि 15 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच युझर्सच्या प्रतिक्रिया काय थांबत नाही आहे.