Ankit Saxena Murder Case: 2018मध्ये झालेल्या अंकित सक्सेना हत्याकांड प्रकरणात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. तीस हजारी कोर्टाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी मोहम्मद सलीम, अकबर अली आणि त्याची पत्नी शहनाज बेगम यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तीस हजारी कोर्टात तीन्ही आरोपींवर 50-50 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे. तीन्ही आरोपांची दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोर्टाने तीन्ही आरोपींवर दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम अंकित सस्केनाच्या कुटुंबाला देण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील कुमार शर्मा याच्या कोर्टाने प्रत्यक्षदर्शी व घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्याआधारे 23 डिसेंबर 2023 रोजी निर्णय सुनावला होता. यात अंकित सस्केनाच्या हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर आज या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.
1 फेब्रुवारी 2018 रोजी 23 वर्षीय फोटोग्राफर अंकित याला त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पश्चिम दिल्लीतील ख्याला परिसरातील रघुबीर नगर दिवसाढवळ्या हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितला अली बेगम, त्याचा अल्पवयीन मुलगा आणि नातेवाईक मोहम्मद सलीम याने 10-15 मिनिटांपर्यंत मारहाण केली. जेव्हा अंकितला मारहाण केली जात होती तेव्हा त्याचे मित्र व कुटुंबीय त्याला वाचवण्यासाठी आले होते. मात्र, आरोपींना त्याच्या आईलादेखील मारहाण केली. त्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांदेखतच अंकितची हत्या करण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा अंकित आणि त्याचे प्रेमसंबंध समोर आल्यानंतर तिच्या घरच्यांनी विरोध केला. त्यानंतरच अंकितची हत्या करण्यात आली. अंकितच्या प्रेयसीने दिलेल्या माहितीनुसार, अंकितच्या हत्येनंतर तिचे कुटुंबीय तिचीही हत्या करतील अशी तिला भिती होती. त्यानंतर महिलेला नारी निकेतनमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर तिला तिच्या मावशीकडे पाठवण्यात आले. तर तिचे काका, आई-वडिल आणि भावाला काहीच दिवसांत पकडण्यात आले.
पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष मानण्यात आली. अंकितची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे कोर्टात सिद्ध झाले होते. कोर्टाने 28 जणांनी साक्ष मानून आरोपींना शिक्षा दिली.