मुंबई : सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF)आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) (National Savings Certificate)यासारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात 1.1 टक्के कपात केली. ही कपात आज 1 एप्रिलपासून 2021-22 च्या पहिल्या तिमाहीसाठी केली गेली आहे. व्याज दर कमी होण्याच्या ट्रेंडच्या अनुषंगाने हे पाऊल उचलले गेले आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पीपीएफवरील व्याज ०.7 टक्क्यांनी कमी करून 6.4 टक्के करण्यात आले आहे, तर एनएससीवर ०.9 टक्के घटून 5.9 टक्के करण्यात आले आहे.
छोट्या बचत योजनांवरील व्याज तिमाही आधारावर सूचित केले जाते. अधिसूचनेनुसार, विविध छोट्या बचत योजनांवरील व्याज दर आर्थिक वर्षाच्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी एप्रिल ते जून या कालावधीत सुधारित करण्यात आले आहेत. पंचवार्षिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याज दर ०.9 टक्क्यांनी कमी करून 6.5 टक्के करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत व्याज तिमाही आधारावर दिले जाते. पहिल्यांदा बचत खात्यातील ठेवीवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 3.5 टक्के केले आहे. आतापर्यंत त्यात वर्षाकाठी 4 टक्के व्याज मिळत असे.
2021-22 च्या पहिल्या तिमाहीसाठी मुलींसाठी सुकन्या समृध्दी योजनेवरील व्याज 0.7 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. किसान विकास पत्रावरील वार्षिक व्याज दर ०.7 टक्क्यांनी कमी करून 6.2 टक्के करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यावरील व्याज 6.9 टक्के होते. 2016 मध्ये वित्त मंत्रालयाने तिमाही आधारावर व्याज दर निश्चित करण्याची घोषणा केली आणि सांगितले की छोट्या बचत योजनांवरील व्याज सरकारी रोख्यांच्या परताव्याशी जोडले जाईल.
एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर व्याजात जास्तीत जास्त 1.1 टक्के कपात केली गेली आहे. आता त्यावर व्याज 4.4 टक्के असेल, जो आतापर्यंत 5.5 टक्के होता. त्याचप्रमाणे दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 5टक्के करण्यात आले आहे, तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज ०.4 टक्के कमी केले आहे, तर पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज ०.9 टक्के कमी केले आहे. 5.8 टक्के गेला गेला आहे.