Traffic police rules for bike: बरेच लोक असे असतात ज्यांना मूळ गाडीत चेंजेस करायची सवय असते ज्याला आपण फॅन्सी चेंजेस म्हणतो. आपली वेहिकल सर्वांपेक्षा हटके असावी म्हणून गाडीला मॉडिफाय करण्याचं फॅड आलं आहे पण हेच फॅड तुम्हाला दंड भरायला भाग पडेल कारण टू व्हीलरमध्ये चेंजेस करणं हे वाहनांच उल्लंघन करण्यासारखं आहे त्यामुळे अशाच वाहनांना वाहतूक पोलीस सर्वात आधी थांबवतात.
सायलेन्सर
काही बाईक्स चा सायलेन्सरचा आवाज इतका कर्कश असतो कि आपल्याला ऐकून कधीकधी प्रचंड राग येतो पण हा च आवाज तुमचा खिसा खाली करेल आणि भलं मोठा दंड भराव लागेल .
फॅन्सी नंबर प्लेट
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदेशीर आहे. जर तुम्हीही असं काही केलं असेल तर लक्षात ठेवा सर्वात जास्त वाहन चलन अशाच गाड्यांचे कापले जातात त्यामुळे तुमच्या बाईकच्या नंबर प्लेटसोबत जास्त छेडछाड करू नका.
जुनी गाडी
जर तुमची गाडी जुनी किंवा रंग गेलेली आढळली तरी देखील पोलीस तुम्हाला पकडू शकतात. बऱ्याचदा जुन्या गाड्याची पीयुसी निघत नाही तरी देखील लोक त्याला वापरतात. तसेच काही लोक गाडी जुनी आहे, म्हणून त्याचे पेपर्स काढत नाहीत. यामुळे पोलीस शक्यतो अशा गाड्यांना थांबवतात.
(वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे आणखी बरेच असे नियम आहेत जे मोडलेत तरी तुम्हाला दंड भरावा लागेल)