नवी दिल्ली : आज शेअरबाजारात विकली एक्सपायरी दिवस आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदरपासूनच दबाव बनला आहे. अशात बाजाराला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही आहेत. बाजार एका गोष्टीने घाबरलेला आहे. ही गोष्ट अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितली तर शेअर बाजार तोंडावर पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वाहा होार आहेत.
गेल्या अर्थसंकल्पात नंतर आतापर्यंत सेंसेक्सने ३० टक्केचा परतावा दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या या आठवड्यात गुंतवणूकदार जोरदार विक्री करत आहेत.
शेअर बाजारासंबधी एक्सपर्टनुसार यावेळी बजेटमध्ये अर्थमंत्री लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG)लावण्याचा प्रस्ताव देऊ शकता. असे झाले तर शेअर बाजाराला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात हा टॅक्स लागला तर गुंतवणूकदार पैसा काढून घेऊ शकतात. सध्या एका वर्षात शेअर विकल्यास कमीत कमी १५ टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागत आहे. एका वर्षानंतर हा कोणताही टॅक्स लागत नाही. आता लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावल्यास एक वर्षानंतरही शेअर विकल्यास टॅक्स लागणार आहे. यामुळे बाजारात घबराट पसरली आहे.
चीन, थायलंड आणि सिंगापूर येथे सरकारने कॅपिटल गेन टॅक्सवर पूर्ण सूट दिली आहे.
अमेरिकामध्ये १० आणि १५ टक्के स्लॅबमध्ये ० टक्के आणि सर्वात वरच्या स्लॅबमध्ये २०टक्के आहे.
कॅनडामध्ये १५ ते ३३ टक्के टॅक्स, सर्व कॅपिटल गेन्सवर ५० टक्के कपात
ऑस्ट्रेलिया १९ ते ४५ टक्के आहे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स
ब्रिटनमध्ये लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये कोणतेही अंतर नाही. टॅक्सचा दर १० ते २० टक्के आहे.
जर्मनी १ जानेवारी २००९ नंतर खरेदी केलेल्या शेअरवर २५ टक्के विथ होल्डिंग टॅक्स लागतो.