बिहारः लग्नाचा मांडव सजला, मंगलाष्टकांसाठी नातेवाईक जमले इतक्यात नवरीने लग्नाला ठाम नकार दिला (Woman Cancels Wedding) . मुहूर्त टळून जात असल्याचे पाहून तिला कुटुंबीयांनी समजावून सांगितले मात्र तिने लग्नाला उभं राहण्यास नकार दिला. अखेर नवरदेवाने भावी वधुचा नकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने सांगितलेले कारण ऐकून नवरदेवही हतबल झाला. तर, मांडवात उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांचा संताप अनावर झाला. (bride cancels wedding)
बिहार राज्यातील भगलपूर येथे राहणाऱ्या तरुणीचं लग्न जमलं. सगळं काही सुरुळीत सुरु होते लग्नाचा दिवस उजाडला तेव्हाच लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी दिला नवऱ्याबाबत असं काही सांगितलं की त्याने तडक लग्न न करण्याचाच पवित्रा घेतला. नवरदेव तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. शिवाय त्यांचा रंगही काळा आहे, अशी माहिती एका नातेवाईकांनी नवरीला दिली. नातेवाईकांने दिलेली माहिती ऐकून नवरी अस्वस्थ झाली. काळ्या रंगाविषयी असलेली असुया यामुळं तिने मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वीच लग्नालाच नकार कळवला. मुलीचा नकार कळताच तिच्या वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तसंच, तिच्या बहिणीसह होणाऱ्या सासऱ्यांनीही तिला लग्न न मोडण्याची विनंती केली. इतकंच नव्हे तर फोटोग्राफरनेही तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने कोणाचेच ऐकून घेतले नाही.
हे वाचलत काः युट्यूबवरुन दिले शेअर मार्केटचे धडे, विश्वास मिळवला, राजस्थानात बसून पुणेकराला घातला लाखोंचा गंडा
लग्नाच्या इतर विधी झाल्या होत्या फक्त मंगलाष्टका बाकी असताना लग्न मोडणं योग्य ठरणार नाही, असं वधुच्या वडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. लग्नाला आलेल्या नातेवाईकांनीही तिने मत बदलावे म्हणून तिला गळ घातली. मात्र तिने कोणाचच ऐकून घेतलं नाही. याउलट कोणी मला लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली.
नवरीचा हा निर्णय ऐकून मांडवातील सर्वच मंडळींनी आश्चर्य व्यक्त केले. इतकंच नव्हे तर हतबल झालेला नवरदेव आपल्या कुटुंबाला घेऊन मांडवातून निघून गेला. घडलेला प्रकार पाहून वऱ्हाडीदेखील लग्न मांडवातून परतले. हा अजब प्रकार ऐकून अनेकांनी नवरीबाबत संतप्त प्रतिक्रियादेखील दिली आहे.
दरम्यान, एक वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील बरेली येथेही अशीच एक घटना घडली होती. नवरदेवाचा रंग काळा होता म्हणून नवरीने लग्न करण्यास नकार दिला होता. हे प्रकरण कोर्टातदेखील गेले होते. तर, उत्तर प्रदेशातील इटवाहमध्येही असाच प्रकार घडला होता. एका मुलीने दोन फेऱ्यानंतर लग्नाला नकार दिला होता. नवरदेवाचा रंग काळा होता म्हणून लग्नमांडवातच तिने नकार दिल्याने मोठा गोंधळही निर्माण झाला होता.