तिहेरी तलाक बिल: भाजप आणि काँग्रेसचा राज्यसभेत हजर राहण्यासाठी खासदारांना व्हिप

राज्यसभेत बिल पास करण्याचं मोठं आव्हान

Updated: Dec 30, 2018, 06:02 PM IST
तिहेरी तलाक बिल: भाजप आणि काँग्रेसचा राज्यसभेत हजर राहण्यासाठी खासदारांना व्हिप title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि राज्यसभेत ३१ डिसेंबरपर्यंत उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हिप जारी केला आहे. काँग्रेसने देखील आपल्या खासदारांना तीन लाईनचा व्हिप जारी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर हा व्हिप जारी करण्यात आला आहे. या मुद्द्यावर लोकांनी काँग्रेसच्या विरोधात जावू नये म्हणून हा व्हिप जारी करण्यात आला आहे. तिहेरी तलाक प्रतिबंधक बिल सोमवारी राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. राज्यसभेत हे बिल पास करणं मोदी सरकारसाठी मोठं आव्हान असणार आहे. कारण सरकारकडे बहुमत नाही. तिहेरी तलाक बिल गुरुवारी लोकसभेत सादर केलं गेलं. त्याआधी त्यावर चर्चा झाली. या ऐतिहासिक वेळी संसदेतील अर्ध्या पेक्षा अधिक खासदार गैरहजर होते. व्हिप जारी करुनही भाजपचे ३० खासदार गैरहजर होते. गुरुवार लोकसभेत फक्त २५६ खासदार उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी शनिवार म्हटलं की, 'त्यांचा पक्ष तिहेरी तलाकच्या विरोधात नाही. हे विधेयक सध्याच्या स्थितीत राज्यसभेत पास नाही होऊ दिलं जाणार. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, काँग्रेस आणि इतर पक्षाचे खासदार या विधेयकाला राज्यसभेत पास नाही होऊ देणार. हे बिल जेव्हा लोकसभेत सादर केलं गेलं तेव्हा १० विरोधी पक्षाने त्याला विरोध केला.'

गुरुवारी तिहेरी तलाक बिलमध्ये संशोधनाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि एआयएडीएमकेसह अनेक पक्षाच्या खासदारांनी सदनमधून वॉक आऊट केलं. यानंतर बिलवर वोटींग घेण्यात आली. बिलच्या बाजुने २४५ तर विरोधात ११ मतं पडली. आता हे बिल सोमवारी राज्यसभेत पास केलं जाणार आहे. काँग्रेसने हे बिल राज्यसभेत पास नाही होऊ देणार असं म्हटलं आहे. त्यामुळे यामुद्द्यावर गोंधळ होण्याची शक्य़ता आहे.