भाजप कडून १८वी यादी जाहीर.. २४ जागांसाठी उमेदवार घोषित

 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अठरावी यादी जाहीर केली आहे.

Updated: Apr 6, 2019, 06:39 PM IST
भाजप कडून १८वी यादी जाहीर..  २४ जागांसाठी उमेदवार घोषित title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अठरावी यादी जाहीर केली आहे. हरयाणा, यूपी आणि झारखंड येथे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये हरयाणाच्या ८ उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या पुरूलिया अणि झारखंडमध्ये तीन उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. लोकसभाव्यतिरिक्त ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा आणि उत्तर प्रदेशच्या निगाहसनमध्ये भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपाने हरियाणातील ८ उमेदवारांची नावे निश्चित केले आहे. यामध्ये, फरीदाबादच्या कृष्णपाल गुर्जर, गुरुजीरामधील राव इंद्रजीत सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अंबालाचे रतनलाल कटारिया यांनी भाजपला उमेदवारी दिली आहे. कुरुक्षेत्रातील निरबसिंग सैनी, सिरसा येथून सुनीता दुग्गल, कारलालमधील संजय भाटिया, सोनीपतचे रमेश चंद्र कौशिक, धर्मवीर सिंह यांना भिवानी महेंद्रगढ येथून उमेदवारी दिली आहे.

मध्यप्रदेशमध्ये भाजपाने विवेक सेजवाळकर यांना उमेदवारी दिली आहे. सध्या ते ग्वाल्हेरचे महापौर आहेत. छिंदवाडा येथील कमलनाथचा मुलगा निखुलनाथ मैदानात उतरले आहेत. महेन्द्र सोलंकी यांना देवास येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाने राजस्थानमधील चार जागांवर भाजपाने आपले उमेदवार घोषित केले आहेत. भरतपूरमधील रंजीता कोहली, बारमेरचे कैलाश चौधरी, करौली धालपूरचे मनोज राजौरीया आणि राजसमंदच्या दीया कुमारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील फुलपूरमधून भाजपाने केसरी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालगंजमधून नीलम सोनकर, झांसी मधून अनुराग शर्मा आणि बांदामधून आर.के. पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

झारखंडमधील छत्रामधून भाजपाने सुनील सिंह, कोडरमामधून अन्नपूर्णा यादव यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केले आहे. रांचीमधून संजय सेठ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिधप्रसाद तराई यांना ओडिशाच्या जगतसिंहपूर मतदारसंघातून संधी मिळाली आहे. याशिवाय ओडिशातील विधानसभा जागांसाठी दोन चेहऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रपारा येथून सुनाकर बेहरा आणि कटकापूर येथून रवी मलीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.