अमित शहांचे १५ मिस्ड कॉल, नंतर कळालं उपमुख्यमंत्री बनवायच होतं

तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलय हे सांगण्यासाठी अमित शाह सारखे फोन करत होते 

Updated: May 19, 2018, 03:15 PM IST
अमित शहांचे १५ मिस्ड कॉल, नंतर कळालं उपमुख्यमंत्री बनवायच होतं

नवी दिल्ली : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एखाद्या व्यक्तिला फोन करतील आणि तो रिसिव्ह करणार नाही अस होणं शक्य नाही. खासकरुन तो राजकिय नेता आणि त्यातही भाजपाचा सदस्य असेल तर नाहीच नाही. अशी कल्पनाही होऊ शकत नाह. पण अस प्रत्यक्षात झालय. एक-दोन वेळा नाही तर तब्बल पंधरा वेळा असं झालय. एका राज्याचे उपमुख्यमंत्री बनविल्याचे सांगण्यासाठी अमित शहांचे हे १५ वेळा फोन येत होते.जम्मू काश्मीरचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता यांच्यासोबत हा किस्सा घडलाय. त्यांच्या राजकिय जीवनात आलेल्या बदलामध्ये या १५ मिस्ड कॉलची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलय हे सांगण्यासाठी अमित शाह सारखे फोन करत होते पण कविंद्र यांनी काही फोन रिसिव्ह केला नाही.

हे होत कारण 

अमित शहांनी १५ वेळा फोन केलला पण कविंद्र गुप्तांनी रिसिव्ह केला नाही. याच्यामागच कारणही समोर आलय. त्यावेळेस कविंद्र यांचा फोन चार्जिंगला असल्याने त्यांना फोन उचलता आला नाही. जम्मूच्या केएल सहगल हॉटेलात आपला हा अनुभव त्यांनी शेअर केला. राष्ट्रीय अध्यक्षांचे १५ मिस्ड कॉल बघून कविंद्र चांगलेच घाबरले. त्यानंतर त्यांनी जेव्हा त्यानंबरवर पुन्हा फोन केला तेव्हा 'तुम्ही फोन का रिसीव्ह करत नाही आहात ? घ्या राष्ट्रीय अध्यक्षांशी बोला' असे शब्द ऐकू आले. 

'मी अमित शहा बोलतोय'

 तुम्हाला उपमुख्यमंत्री पादाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे फोनवर सांगण्यात आले. पण कविंद्र यांना विश्वास बसला नाही. फोनवर आधी कोण बोलल होत हे पाण्यासाठी कविंद्र यांनी पुन्हा त्यानंबरवर फोन केला. समोरून उत्तर आल मी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोलतोय.