गर्लफ्रेंडशी भांडला आणि रस्त्यावर रुसून झोपला, आणि मग.... पाहा व्हिडीओ

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यातील एक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Dec 17, 2021, 07:57 PM IST
गर्लफ्रेंडशी भांडला आणि रस्त्यावर रुसून झोपला, आणि मग.... पाहा व्हिडीओ title=

नवी दिल्ली : कोणत्या कपलमध्ये कोणत्या भांडणं होत नाहीत. पण करामती मात्र काहीच कपल करतात. गेल्या काही दिवसात असे व्हिडीओ समोर येत आहे. आता चक्क एका तरुणानं हद्दच पार केली. गर्लफ्रेंडशी भांडला म्हणून स्वत: रस्त्यात अडवा झोपला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यातील एक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंड रस्त्याच्या मधोमध भांडण झालं म्हणून नाटकं करत झोपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. भररस्त्यात लहान मुलासारखा तरुण रागावून झोपलेला दिसत आहे.

गर्लफ्रेंडवर रागावून हा तरुण रस्त्यावर झोपला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं. त्यानंतर तरुणाने भररस्त्यात ड्रामा सुरू केला.हा व्हिडीओ इंडोनेशियातील असल्याची चर्चा आहे.

झी 24 तासने या व्हिडीओची पुष्टी केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवण्यावरून गर्लफ्रेंडशी या तरुणाचं जोरदार भांडण होता. fakta.indo या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की तरुण हातपाय जोरात रस्त्यावर आपटताना दिसत आहे. त्याच्याजवळ गर्लफ्रेंड उभी आहे. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणाला सारखी हात धरून उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र युवक सतत रस्त्यावर हट्टानं झोपत असल्याचं दिसत आहे. 

खूपवेळ हा युकव आपल्या गर्लफ्रेंडवर रागावला होता. गर्लफ्रेंड त्याला बराच वेळापासून मनवत होती. यावेळी रस्त्यावरून वेगानं गाड्या ये-जा करत होत्या. शेवटी गर्लफ्रेंडचं म्हणणं त्याला पटतं. ते दोघंही तिथून निघून जातात. हा व्हिडीओ 4 लाखहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देखील येत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.