Success Story : तुम्हाला यश साध्य करायचं असेल तर तुमच्या अंगी जिद्द, चिकाटी, परिश्रम असे गुण असणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय यश मिळत नसते. अशाच एका जिद्दीची आणि मेहनतीची कहानी आता समोर आली आहे. या कहानीत कांदे-बटाटे विकणाऱ्या बापाची मुलगी मोठी अधिकारी (Officer) बनली आहे. गरीबी आणि शिक्षणातील अडचणींवर मात करून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाची कहानी (success story) सोशल मीडियावर चर्चेत आहे.
जुही कुमारी (Juhi Kumari) हीने बिहार लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. या बिहार लोकसेवा आयोग (BPSC) च्या 66 व्या एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला. या निकालात बिहारला अनेक टॉपर्स मिळाले होते. या टॉपर्सपैकी एक जुही कुमारी ठरली आहे. तिने या परिक्षेत 307 वी रँक मिळवली होती. यामुळे जुहीची बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. या तिच्य़ा निवडीवर आता संपुर्ण गावात तिचे कौतूक होत आहे.
जुही (Juhi Kumari) खुप सामान्य घरातून येते. तिचे वडिल रस्त्यावर कांदे-बटाटे विकायचे. हे कांदे-बटाटे विकून त्यांनी तिला लहानाच मोठं केले होते. जुहीने मधौरामध्ये राहून इंटरमिडिएटपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी छपरा येथून ग्रॅज्युएशन केलं.ग्रॅज्युएशननंतर तिने बीपीएससीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिने 307वी रँक मिळवली होती. यामुळे तिची आता बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने तिच्या वडिलांच्या कष्टाच चीज झालं आहे.
बीपीएससीच्या मुख्य परीक्षेत ती दोनदा नापास झाली होती. पण तीने हिंमत हरली नाही. ती प्रयत्न करत राहीली आणि तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. तिसर्या प्रयत्नात तिला 307 वी रँकही मिळाली. जुहीची (Juhi Kumari) बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने तिचे आई-व़डिल खुप आनंदी आहे.
दरम्यान जुहीची (Juhi Kumari) ही कहानी अनेकांसाठी खुप प्रेरणादायी ठरू शकते. कारण जुहीने अनेक वाईट प्रसंगावर मात करत हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाची संपुर्ण गावात चर्चा आहे.