मुंबई : शापूरजी पालोनजी ग्रुपचे चेअरमन पल्लोनजी मिस्त्री यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शापूरजी पालोनजी समूहाचा व्यवसाय अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि आर्थिक सेवांमध्ये पसरलेला आहे. या ग्रुपमध्ये सुमारे 50 हजार लोक काम करतात. कंपनीचा व्यवसाय 50 देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांचा मुलगा सायरस मिस्त्री हे एकदा टाटा सन्सचे अध्यक्ष होते. मात्र, काही वादानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
शापूरजी पालोनजी समूह ही देशातील ऐतिहासिक कंपनी आहे. हा समूह गेल्या दीडशे वर्षांपासून काम करीत आहे. पालोनजी मिस्त्री यांना 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
आयर्लंडमधील सर्वात श्रीमंत माणूस
पल्लोनजी मिस्त्री यांचा जन्म 1929 साली झाला. ते सर्वात श्रीमंत आयरिश आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती $28.9 अब्ज आहे आणि ते जगातील 41 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते आयर्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
टाटा सन्समध्ये 18.37% हिस्सा
टाटा सन्समध्ये शापूरजी पालोनजी समूहाचा मोठा हिस्सा आहे. टाटा सन्समध्ये एसपी ग्रुपचा 18.37 टक्के हिस्सा आहे. सायरस मिस्त्री यांनाही टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. पण काही वाद न्यायालयात गेल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले.
समूहावर कर्जाचा बोजा
एसपी ग्रुप सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनीवर कर्जाचा मोठा बोजा आहे. अशा परिस्थितीत समूहाला काही नॉन-कोअर व्यवसाय विकून निधी उभारायचा आहे. टाटा सन्समधील हिस्सेदारी विकणे हे या अंतर्गत उचललेले पाऊल आहे.