Chandrayaan 3 : चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा अखेर पार पडला आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहरे पडून चांद्रयान 3 चा आता थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. चांद्रयान 3 आतापर्यंत पृथ्वीच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत होते. आता चांद्रयान 3 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. चांद्रयान-3 पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असलेल्या कक्षेतून थेट चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे.
1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 12:00 ते 1:00 दरम्यान ट्रान्सलुनर इंजेक्शन (TLI) पार पडणार आहे. ट्रान्सलुनर इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर चांद्रयान-3 चंद्राला दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत पुढे जाईल. चांद्रयान-3 अंतराळयानाने 127609 किमी x 236 किमीची कक्षा गाठणे अपेक्षित आहे. निरीक्षणानंतर हा आकडा नेका किती आहे ते स्पष्ट होईल. 31 जुलैपर्यंत चांद्रयान-3 एक लाख किलोमीटरच्या कक्षेत नेण्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे.
14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. 5 ते 6 ऑगस्टदरम्यान चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. अंडाकृती आकारात घिरट्या घालत चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने मार्गक्रमक करेल. यानंतर चंद्राजवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल. 23-24ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल हा टप्पा ISRO च्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत अव्हानात्मक टप्पा असणार आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.