सोन्याची तस्करी करायला डोकं लावलं, पण डोकं उघडूनच कस्टम अधिकाऱ्यांनी पाहिलं

, याचा व्हीडिओ देखील त्यांनी ट्ववीटरवर ट्ववीट केला आहे. एवढंच नाही तर तस्करांनी

Updated: Mar 22, 2021, 05:54 PM IST
 सोन्याची तस्करी करायला डोकं लावलं, पण डोकं उघडूनच कस्टम अधिकाऱ्यांनी पाहिलं title=

चेन्नई : चेन्नई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सोनं जप्त करण्यात आलं आहे. पण येथे सोन्याची तस्करी करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला तो अगदी वेगळा आहे. ज्यांना डोक्यावर केस नसतात अशा व्यक्ती आता विग बसवून घेतात, हा विग शिवलेला असतो, तो डोक्यावर अगदी फिक्स बसवलेला असतो, जेणेकरुन या व्यक्तीने विग लावलेला आहे किंवा नाही हे समजणार नाही.

पण याच गोष्टीचा सोने तस्करांनी फायदा घेतला आहे. हे सोनं डोक्यावर जेथे विग चिटकवला जातो त्याच्याखाली चिटकवलं होतं, पण तरीही कस्टमने हे शोधून काढलं आहे, याचा व्हीडिओ देखील त्यांनी ट्ववीटरवर ट्ववीट केला आहे. एवढंच नाही तर तस्करांनी अंडरविअरमध्येही सोनं लपवलेलं होतं.

चेन्नईत सुमारे अडीच कोटी रुपयांचं , ५.५५ किलो सोनं कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे. खाडी देशातून हे सोनं भारतात तस्करी करण्याचा हा प्रयत्न होता. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.