नवी दिल्ली : एका पूलाच्या उद्घाटनासाठी दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी पोहचल्याने एकच राडा झाला. कार्यक्रमादरम्यानच भाजप आणि आपचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी मनोज तिवारी यांना आपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही. मी उत्तर दिल्लीचा खासदार असल्याने या पुलाच्या उद्घाटनासाठी आल्याचं मनोज तिवारी यांनी म्हटलं. यावेळी त्यांना आपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
#WATCH BJP Delhi Chief Manoj Tiwari, his supporters and AAP supporters enter into a scuffle at the inauguration of the Signature Bridge in Delhi; Police present at the spot pic.twitter.com/NhvqxudDTT
— ANI (@ANI) November 4, 2018
आपल्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी थांबलो असताना अचानक आपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे.
#WATCH Following ruckus at inauguration of Delhi's Signature Bridge, BJP MP from North East Delhi Manoj Tiwari says "Police ke jin logon ne mujhse dhakka-mukki ki hai unki shinakht ho gayi hai. Mein in sabko pehchaan chuka hun aur 4 din mein inko bataunga ki police kya hoti hai." pic.twitter.com/Pstba0IreY
— ANI (@ANI) November 4, 2018
मनोज तिवारी हे व्हीआयपी असल्यासारखे वावरत होते. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आपच्या दिलीप पांडे यांनी केला आहे.
Thousands of people have come here to celebrate without an invitation card, but the MP (Manoj Tiwari) considers himself VIP. He is doing hooliganism. BJP people thrashed AAP volunteers & local people. They are admitted to hospital: Dilip Pandey, Aam Aadmi Party. #SignatureBridge pic.twitter.com/Il0qFQ9GzA
— ANI (@ANI) November 4, 2018