Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी बुधवारी अयोध्येतील राम मंदिराच्या पवित्र गर्भगृहाचे शिलापूजन केले आणि म्हटले की, हे मंदिर राष्ट्रमंदिर आणि लोकांच्या आस्थेचे प्रतिक असेल.
मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि राम मंदिर न्यासच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारणसह गाभाऱ्याचा पाया रचला गेला. गर्भगृहाच्या कामाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी म्हटले की, 'हे मंदिर लोकांच्या आस्थेचं प्रतिक असेल', हे एक राष्ट्रमंदिर असेल आणि त्याचं कार्य पूर्ण वेगाने पूर्ण होईल'.
मुख्यमंत्री योगी यांनी म्हटलं की, 'भक्तांची 500 वर्षाची तपस्या सफल होणार आहे. आता येथे मंदिर होणार आहे. राम जन्मभूमी मंदिराचे निर्माण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरू करण्यात आले. निर्माणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम गर्भगृहाची आधारशिला ठेवण्यासोबत सुरू करण्यात आलं आहे.'
पूर्व अयोध्येला रंगेबिरंगी फुलांनी सजवण्यात आलं
याआधी पवित्र गर्भगृहाच्या निर्माणाबाबत भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अयोध्येत उत्सव असल्यासारखे लोकं आनंदी आहेत. अयोध्येतील इतर मंदिरांना फुलांनी सजवण्यात आले तसेच दिवे देखील लावण्यात आले.