पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला आदर्श

बहुतांश बड्या अधिकाऱ्यांचे आयुष्य उच्चभ्रू असते. परंतु जिल्हाधिकारीपदावरील व्यक्तीने आपल्या पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून मोठा आदर्श घालून दिला आहे.

Updated: Nov 13, 2021, 02:20 PM IST
पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला आदर्श title=

हैद्राबाद : बहुतांश बड्या अधिकाऱ्यांचे आयुष्य उच्चभ्रू असते. परंतु जिल्हाधिकारीपदावरील व्यक्तीने आपल्या पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून मोठा आदर्श घालून दिला आहे. अनेकदा सर्वसाधारण लोकं देखील सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यास नाक मुरडतात. परंतू भद्रादी - कोठागुडेमचे जिल्हाधिकारी अनुदीप दुरीशेट्टी या सर्वाला अपवाद ठरले आहेत. 

तेलंगनातील भद्रादी - कोठागुडेमचे जिल्हाधिकारी अनुदीप दुरीशेट्टी (Collector Anudeep Durishetty)यांनी त्यांची गर्भवती पत्नी माधवीला भद्राचलम येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं.

माधवीचे सी - सेक्शन ऑपरेशन झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांबाबत कौतुकास्पद मत व्यक्त केलंय. आई आणि बाळ दोन्ही निरोगी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांबाबत बोलताना म्हटले की, आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला हैद्राबादमधील मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता.

परंतु सरकारी रुग्णालय देखील कॉर्पोरेटपेक्षा कमी नाही. हे या अधिकाऱ्यांनी सिद्ध केलं आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी माधवी याच रुग्णालयात नियमित तपासणी करीत असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तेलंगनाचे अर्थमंत्री टी.हरीश राव यांनी अनुदीप दुरीशेट्टी यांचे कौतुक केले तसेच पत्नीच्या प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयाची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.