मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॉग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना सौम्य तापाची लक्षणे जाणवत होती, त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.
सोनिया गांधी यांना सौम्य तापाची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत सोनिया गांधी यांचा कोरोना रीपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान सोनिया गांधी सध्या अलगीकरणात ठेवले आहे. तसेच सोनिया गांधी यांनी सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांत सोनिया गांधी यांनी पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यातील काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. त्यानंतर खबरदारी म्हणून त्या लखनौहून दिल्लीला परतत आहेत.
सोनिया गांधी यांची ८ जूनला ईडीची चौकशी
सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं चौकशीसाठीची नोटीस पाठवली आहे. येत्या ८ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. पण आता सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चौकशीसाठी त्या उपस्थित राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ईडी चौकशीला सामोरे जाणार
सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्या ठीक असल्याची माहिती रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिलीय. सुरजेवाला पुढे म्हणाले, सोनिया गांधी यांनी मला सांगितले आहे की, त्या ८ जूनला ईडीसमोर हजर होतील. राहुल गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावले होते मात्र ते हजर राहू शकले नाही आहेत. राहुल सध्या परदेशात असल्याने त्यांनी ईडीकडे आणखी वेळ मागितला आहे.