cooking tips: भात कुकरमध्ये की बाहेर भांड्यात शिजवलेला तुम्हाला कोणता आवडतो असा सहज प्रश्न विचारला जातो. अनेकांना तर बाहेर शिजवलेला भाज आवडतो. तो भाज आपल्याला हवा तसा शिजवून घेता येतो मात्र कुकरचं तसं नसतं. पण कोणता भात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का? दोन्ही पद्धतीमधून कोणती पद्धत अधिक जास्त चांगली आरोग्याच्या दृष्टीनं याचा कधी विचार केलाय का? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत. (how to cook rice in pressure cooker)
आपल्याकडे अनेक ठिकाणी भाताशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. भात खाणं पोटासाठी चांगलं असतं. भात खाल्ल्यानं लवकर भूक लागत नाही असंही म्हणतात.
भात शिजवण्याच्या जशा दोन पद्धती म्हणजे एक प्रेशर कुकर आणि दुसरी म्हणजे गॅसवर भांड्यात किंवा पातेल्यामध्ये शिजवण्याची पद्धत आहे. दोन्ही पद्धतीने शिजवलेल्या भाताची चवही वेगळी येते. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम नेमका कसा होतो पाहा.
आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर म्हणजे प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण कुकरमध्ये भात शिजवतो तेव्हा त्यामधून कोणतंही पाणी बाहेर काढून टाकत नाही.
स्टार्च भातामध्ये तसाच राहातो. त्यामुळे कुकरमध्ये शिजवलेला भात खाल्ल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तांदळाचा स्टार्च टिकून राहतो.
त्यामुळे तांदूळ जास्त काळ पोट भरून ठेवतो आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. भूक न लागल्याने वजनही नियंत्रित होते. एवढेच नाही, जेव्हा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवला जातो, तेव्हा तो अधिक चांगला शिजतो,
ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात पचवायला कमी कष्ट लागतात.
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणं सोपं आणि कमी वेळात भात शिजतो. गॅसची बचत होते. पाण्याच्या प्रमाणाचा अंदाज आला की बरोबर आपला भात होतो. हा भात पौष्टिकही असतो.
(सूचना- ही माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. या माहितीची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. या गोष्टी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)