मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती सतत नियंत्रणाबाहेर जात आहे. दररोज 3 लाखाहून अधिक नवीन संक्रमित केसेस समोर येत आहेत, तर दररोज हजारो लोकांना मृत्यू होत आहे. परंतु संसर्गाच्या या दुसर्या लाटेत आणखी एक धोका दिसतो आहे. मुलांमध्ये कोरोना इन्फेक्शनचा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूच्या या दुसर्या लाटेत, मोठ्या संख्येने मुले देखील संक्रमित होत आहेत. हे लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने प्रथमच मुलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
ज्या मुलांना कोरोना इन्फेक्शन आहे परंतु या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशा मुलांसाठी कोणतेही उपचार सुचविलेले नाही. त्यांच्या संभाव्य लक्षणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
- मुलांना संसर्गाची सौम्य लक्षणे असल्यास जसे की घसा खवखवणे किंवा घसा दुखणे, कफ. पण श्वसनाची कोणतीही समस्या नसल्यास त्यांना इतरांपासून वेगळं ठेवा. (Home isolation)
-शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, द्रव पदार्थ द्या.
- ताप आला तर 10-15 मिलीग्राम 10-15 mg पॅरासिटामोल (Paracetamol) द्या.
- जर काही गंभीर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
- या श्रेणीमध्ये अशा मुलांचा समावेश आहे ज्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी आहे. परंतु मुलामध्ये न्यूमोनियाची लक्षणे नसतात.
- मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले जाऊ शकते.
- त्यांना अधिक द्रव पदार्थ द्या. ज्यामुळे डिहायड्रेशन पण ओव्हरहायड्रेशन होऊ नये याची पण काळजी घ्या.
- विषाणूजन्य संसर्ग असल्यास एमोक्सिसिलिन आणि ताप असल्यास पॅरासिटामोल दिले जाऊ शकते.
- जर मुलाच्या शरीरात ऑक्सिजन लेवल 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा लागेल.
- या टप्प्यात मुलांना न्यूमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS), मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम (MODS) आणि सेप्टिक शॉक सारखे गंभीर लक्षण दिसू शकतात.
- अशा मुलांना त्वरित आयसीयू किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मार्गदर्शकतत्त्वात या मुलांसाठी कंप्लीट ब्लड काउंट, लिवर, रीनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.