मुंबई : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणादरम्यान, काही लोक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी धोकादायक उपाययोजना करीत आहेत. त्यामध्ये शेण आणि गोमूत्र (Treatment with Cow Dung) देखील समाविष्ट आहे. गुजरातमधील डॉक्टरांनी तथाकथित 'शेण उपाचर' पद्धतीविरोधात इशारा दिला आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, शरीरावर शेणाची पेस्ट लावल्यास कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळू शकत नाही, तर उलट म्यूकोरमाइकोसिस आजारासह इतर अन्य आजारांचे संक्रमण होऊ शकते. यामुळे तुमचा नाहक बळी जाऊ शकतो. त्यामुळे शेणाचा लेप लावणे धोकादायक ठरु शकते, सावध राहा. गांधीनगरमधील भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळणकर म्हणाले, 'हे उपचार लोकांना खरोखर मदत करेल की नाही हे मला माहिती नाही. आतापर्यंत कोणतेही संशोधन झालेले नाही, जे सूचित करते की शरीरावर शेण लावल्याने कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढेल.
श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानम (एसजीव्हीपी) द्वारा संचालित गोशाळेमध्ये उपचार घेण्यास अनेक लोक जात आहेत आणि त्यांचा विश्वास आहे की यामुळे कोविड -19 विरुद्ध त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. या गोठ्यात 200 हून अधिक गायी असल्याचे एसजीव्हीपी अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की गेल्या एका महिन्यापासून दर रविवारी सुमारे 15 लोक शरीरावर शेण आणि गोमूत्र लावण्यासाठी येतात. नंतर ते गाईच्या दुधात धुतले जाते.
अहमदाबादमध्ये 'शेणासह उपचार' करण्याच्या या वाढत्या ट्रेंडमुळे डॉक्टर आश्चर्यचकित झाले आहेत. ते ही पद्धत प्रभावी मानत नाहीत. SGVP अधिकाऱ्याने सांगितले की, हे उपचार घेत असलेल्यांमध्ये काही फ्रंटलाइन कर्मचारी आणि औषधांच्या दुकानात काम करणारे लोक आहेत. डॉक्टर मात्र हा उपाय एक प्रभावी नाही, असे सांगत आहेत. गांधीनगर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ इंस्टिट्यूटचे संचालक डॉ. दिलीप मावळणकर म्हणाले, हे उपचार लोकांना खरोखर मदत करेल की नाही हे मला माहिती नाही. शरीरावर शेण लावल्याने कोरोना विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढेल ,हे सूचित करण्यासाठी माझ्या मते, असे आधी कोणतेही संशोधन झालेले नाही.
दुसरीकडे, भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) महिला शाखेच्या अध्यक्षा आणि शहरातील ज्येष्ठ डॉक्टर डॉ. मोना देसाई यांनी उपचारांना 'ढोंगी आणि निर्विकार' असे वर्णन केले. त्या म्हणाल्या, 'उपयुक्त असल्याचे सिद्ध करण्याऐवजी शेणाने (Treatment with Cow Dung) उपचार केल्यास म्यूकोरामायसिससह इतर संसर्ग होऊ शकतात.'