मॉस्को: इंटरनॅशनल आर्मी गेम्स 2021 मध्ये चक्क रणगाड्यावर एक कपल बेली डान्स करताना दिसलं आहे. आजूबाजूने फिरणाऱ्या रणगाड्यांशेजारी उभ्या असलेल्या एका रणगाड्यावर या दोघांनी कपल डान्स केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रूस इंटरनॅशनल आर्मी गेम्स 2021 ला सुरुवात झाली आहे. यामध्ये साधारण 40 देशांनी सहभाग घेतला आहे.
डजनभर रणगाडे इकडून तिकडे जात असताना एका रणगाड्यावर उभं राहून कपलने डान्स केला आहे. या दोन्ही कलाकारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणगाड्याच्या वर तीन ते चार फूटाची केवळ जागा असते. त्यामध्ये तोल सावरून अशा पद्धतीनं डान्स करणं म्हणजे एक जोखीमच आहे.
या रणगाड्यावर बेलारूसचा झेंडा दिसत आहे. हे दोघंही जेव्हा डान्समध्ये मग्न असतात तेव्हा आजूबाजूने टँकर ये-जा करत असतात. मात्र या कलाकारांनी आपली कसब दाखवत हा डान्स केला.
Meanwhile, at the Army 2021 arms fair near Moscow, they're performing Swan Lake on a tank... pic.twitter.com/c91D9Bm1XJ
— Francis Scarr (@francska1) August 24, 2021
आर्मी गेम्समध्ये भारतीय सेन्याचे 101 सैनिक सहभागी झाले आहेत. हे गेम्स 4 सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 139 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.