मुंबई : देशात कोरोनाचा उद्रेक आजही पाहायला मिळत आहे. (Coronavirus in India) कोरोनाची दुसरी लाट ओसण्याचे नाव घेत नाही. कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या चौवीस तासात 3.62 लाख लोक कोविड-19ने संक्रमित झाले आहेत. तर 4126 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. लसीकरणही करण्यात येत आहे. मात्र, देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच कोरोनाव्हायरसची दुसरी लाट थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आणखी नवीन रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी 3.29 लाख आणि बुधवारी 3.48 लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोविड -19 च्या (Covid-19 in India) नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे, मृत्यूची संख्याही वाढत आहे आणि गेल्या 24 तासांत 4126 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी, देशभरात 4205 लोकांचा मृत्यू झाला होता, जो कि साथीच्या आजाराच्या (Record Coronavirus Death) सुरू झाल्यानंतरची सर्वात जास्त संख्या आहे. या व्यतिरिक्त 8 मे रोजी 4187 रुग्णांनी आपला जीव गमावला होता.
वर्ल्डोमीटरनुसार गेल्या 24 तासांत 3 लाख 62 हजार 406 लोकांना भारतात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे, तर या काळात 4126 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी एकूण संख्या 2 कोटी 37 लाख 2 हजार 832 पर्यंत वाढली आहे, तर 2 लाख 58 हजार 351 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासांत 3 लाख 51 हजार 762 लोक बरे झाले, त्यानंतर कोविड -19मधून बरे होणाऱ्यांची संख्या 1 कोटी 97 लाख 28 हजार 436 वर गेली आहे. यासह, देशभरात सक्रिय प्रकरणांमध्ये (Coronavirus Active Cases in India) घट झाली आहे आणि देशभरात 3716045 लोकांवर उपचार सुरू आहेत. याआधी बुधवारी कोविड -19चे 3709557 सक्रिय रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.