हा तहानलेला नाही तर भुकेलेला कावळा; खाण्यासाठी ग्लासमध्ये काठी टाकून केला जुगाड... पाहा व्हिडीओ

दगड टाकून कावळ्याने पाणी प्यायल्याची गोष्ट ऐकली असेल भुक लागलेल्यावर कावळा काय करू शकतो हे तुम्हीच पाहा व्हिडीओ

Updated: Sep 11, 2021, 10:47 PM IST
हा तहानलेला नाही तर भुकेलेला कावळा; खाण्यासाठी ग्लासमध्ये काठी टाकून केला जुगाड... पाहा व्हिडीओ title=

मुंबई: लहानपणी जवळपास सगळ्यांनीच तहानलेल्या कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. तहान लागलेल्या कावळ्यानं मडक्यात चोचीनं दगड टाकून पाणी वर काढलं आणि ते पिऊन उडून गेला. याच कथेची थोडीशी पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. फक्त फरक हा की तो कावळा तहानलेला नाही तर खूप जास्त भुकेलेला होता. त्याने खाण्यासाठी केलेला जुगाड पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

सोशल मीडियावर कावळ्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचं कारण तसंच आहे. कावळ्याने आपली भुक भागवण्यासाठी नामी शक्कल लढवली. त्यामुळे या कावळ्याच्या IQ ची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ 21 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

या कावळ्याने भुक लागल्याने खाण्यासाठी काही दिसतंय का ते पाहिलं. जवळच एका ग्लासमध्ये त्याला खायला दिसलं. प्रश्न हा होता की ग्लासचं तोंड लहान असल्यानं चोच आता पूर्ण जाऊ शकत नव्हती. तो खायचा पदार्थ बाहेर कसा काढायचा? कावळ्याला युक्ती सुचली आणि त्याने काठीचा वापर केला. 

या कावळ्याने चोचीने काठी आतमध्ये ढकलून पदार्थ थोडा पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. हुशार कावळ्याने वापरलेली युक्ती खरंच कामी आली आणि त्याला खाण्याचा पदार्थ मिळाला. या कावळ्याची हुशारी पाहून युझर्सही चकीत झाले आहेत. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.