रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 20, 2017, 08:16 AM IST
रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश title=

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

रेल्वेतून प्रवास करताना अनेकवेळा काही रुग्णांना ऑक्सिजन अभावी त्रास सहन करावा लागत होता. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या प्रवाशांना निकड आली तर कृत्रिम श्वासोच्छासाची सोय असावी यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.

प्रवासी आजारी पडल्यास त्याच्यावर गाडीतच उपचार करण्याची सुयोग्य व्यवस्था रेल्वेने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांच्या सल्ल्याने उपलब्ध करावी, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका निकालाविरुद्ध केंद्र सरकारचे अपील निकाली काढताना सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिलाय.

 प्रवासाच्या दरम्यान कोणी आजारी पडले तर लांब पल्ल्याच्या गाडीत एक डॉक्टर, एक नर्स आणि एक मदतनीस यांचे पथक ठेवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. रेल्वेत अस करता येणार नाही, ते अव्यवहार्य व खर्चिक असल्याचे पटल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुधारित आदेश दिलाय.
 
दरम्यान, न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केलेय की, प्रवाशाने तब्येत ठीक नसेल किंवा उपचाराची इच्छा टीसी वा मदतनीसाकडे व्यक्त केल्यास रुग्णालयात नेण्याची आणि  गाडी ज्या ठिकाणी डॉक्टर असतील त्या रेल्वे स्टेशनला कळविणे आणि गाडी तेथे पोहोचताच प्रवाशास संबंधित रुग्णालयात घेऊन जाणे ही रेल्वेची जबाबदारी असेल.

तस दुसरीकडे चालत्या रेल्वेत रुग्णांवर उपचार करण्याचा प्रायोगित तत्वावर पाहिले. मात्र, धावत्या रेल्वेत हा प्रयोग यशस्वी झाला नाही. आजारी प्रवाशाच्या तपासणीसाठीची उपकरणे धावत्या गाडीत नीट चालत नाहीत, असे दिसून आले. 

तसेच रेल्वेने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, मोठ्या रेल्वे स्टेशनवर औषधांच्या दुकानात डॉक्टर ठेवण्याचा प्रयोगही करून पाहिला. परंतु त्यास फारसे यश आले नाही. मात्र, रेल्वे स्टेशनपासून ८० ते ६०० किमीपर्यंत परिसरात अनेक रुग्णालय आहेत. त्यामुळे उपचार करणे शक्य असल्याचे न्यायालयाला सांगितले.