नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा (Delhi Assembly Election 2020) निवडणुकीच्या 70 जागांकरता आज मतदान होणार आहे. दिल्लीत 1.47 करोड मतदान आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नवीन सरकार निवडण्यासाठी मतदार सकाळी 8 वाजल्यापासून मतदान करणार आहेत. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत अतिशय शांतपणे मतदान व्हावं याकरता पोलिस बंदोबस्त करण्यात आले आहेत.
Delhi: Voters start arriving at a polling station in Jhandewalan area, in Karol Bagh assembly constituency. AAP has fielded its sitting MLA Vishesh Ravi from here. BJP's Yogendra Chandolia & Congress' Gaurav Dhanak are contesting from here. Voting begins at 8 AM. #DelhiElections pic.twitter.com/Np04OiU8BE
— ANI (@ANI) February 8, 2020
Delhi: Tajinder Pal Singh Bagga, BJP candidate from Hari Nagar assembly constituency offers prayers at Fateh Nagar Gurudwara. Voting for #DelhiElections2020 to begin at 8 AM. pic.twitter.com/dQq6wNZBPn
— ANI (@ANI) February 8, 2020
दिल्ली पोलीस, होमगार्ड सह सैनिक दल असे 75 हजारहून अधिक जवान वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर तर भाजपने फक्त 3 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाने तर खातंच उघडलं नव्हतं.
Delhi: Visuals from Polling Station 80 at Nirman Bhawan in New Delhi assembly constituency. CM & sitting MLA from the constituency, Arvind Kejriwal is contesting from here. BJP has fielded Sunil Yadav & Congress has fielded Romesh Sabharwal from here. #DelhiElections2020 pic.twitter.com/B16o9tnFsp
— ANI (@ANI) February 8, 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शनिवार ८ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ७०0 सदस्यीय दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी आप विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना असणास असून, 672 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. गेल्यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकरांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता. केजरीवाल त्या विजयाची पुनरावृत्ती करणार का? भाजपचे अमित शाह पुन्हा सत्त्ता खेचून घेणार का? आणि काँग्रेसला या निवडणुकीत किती जागा मिळणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे यंदा शाहिनबाग, जामिया मिलिया, जेएनयू आणि सीएएविरोधातील आंदोलन हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनले होते.