नवी दिल्ली : दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेलाय. त्यात २९ जणांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या (Delhi violence) पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता एस. एन. श्रीवास्तव काम पाहणार आहेत. श्रीवास्तव सध्या दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतात. उद्यापासून ते दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील. हिंसाचारानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
#BreakingNews । दिल्लीतल्या हिंसाचारानंतर मृतांचा आकडा वाढला.. आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू तर ५२ जणांवर उजूनही उपचार सुरू । दोघांची प्रकृती चिंताजनक#DelhiViolence https://t.co/7va86JWkAh pic.twitter.com/I7nYRvV4E8
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 28, 2020
दिल्ली दंगलीचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मृतांपैकी बहुतेकांना बंदुकीच्या गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप आहे. त्यामुळे गोळीबार दंगलखोरांनीच केल्याचं उघड आहे. अनेक रुग्णांवर गुरु तेगबहाद्दूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातही बहुतेकांना
बंदुकीच्या गोळ्या लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे दंगलीत बंदुकांचा बेसुमार वापर झाल्याचं उघड आहे.
दिल्लीतल्या हिंसाचारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तपासासाठी आता ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. दिल्लीतल्या चांद बागमधील खजुरी खास परिसरात दिल्ली पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत. दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिल्लीतल्या तणाव परिसराची पाहणी केली. शिव विहार या परिसरात त्यांनी पाहणी केली. उद्यापासून श्रीवास्तव दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
दिल्लीमध्ये एकीकडे हिंसाचार होत असताना दुसरीकडे काही मुस्लिम नागरिक शांततेसाठी प्रयत्न करीत आहेत. जामा मशिदीमध्ये आज शुक्रवारचं नमाज पठण केले. यावेळी अनेक मुस्लिम नागरिक हातात तिरंगा घेऊन आले होते. त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे. दिल्लीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.