Earthquake Effects in Delhi-NCR Video : अफगाणिस्तानमध्ये आलेल्या तीव्र भूकंपाचे धक्के उत्तर भारताताही दिसून आले. दिल्ली एनसीआरमध्ये अचानक रात्रीच्या वेळी भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच भीतीदायक वातावरण निर्माण झालं. सगळेकडे धावपळ...रात्री 10 वाजता आलेल्या या भूकंपानंतर लोक घराबाहेर पडली. धक्कादायक म्हणजे भूकंपानंतर दिल्लीतील अनेक इमारती झुकल्याचा अहवाल दिल्ली अग्निशमन दलाने दिला आहे. (delhi ncr earthquake 2023 Effects people rush out of houses Shocking video viral on Social media )
पाकिस्तानमध्ये जाणवलेल्या 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे दिल्लीसह अनेक भारतीय शहरांतील नागरिकांनाही घाबरुन सोडलं.
#WATCH | Uttar Pradesh: People rush out of their houses in Vasundhara, Ghaziabad as strong earthquake tremors felt in several parts of north India. pic.twitter.com/wg4MWB0QdX
— ANI (@ANI) March 21, 2023
अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात केंद्रबिंदू असलेल्या या ठिकाणी भूकंप दोन मिनिटांपर्यंत होता. भूकंपाचे केंद्र पाकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या अफगाणिस्तानच्या जुर्म शहरापासून 40 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होते.
भूकंपाच्या वेळी छताचे पंखे आणि लाईट फिक्स्चर हलतानाचे व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. काश्मीर आणि जयपूरसारख्या राज्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
राजधानीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि लोक रस्त्यावर पळत सुटली. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने उत्तर कॅम्पसमधील त्यांच्या वसतिगृहाबाहेर अनेक विद्यार्थी दिसतं आहेत.
VIDEO | People rush out of their houses in Delhi-NCR as earthquake felt in north India. pic.twitter.com/qfxYolZhy2
— Press Trust of India (@PTI_News) March 21, 2023
भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर मोठ्या मोठ्या इमारतीतून रहिवाशी पायऱ्यांनी खाली उतर मोकळ्या मैदानात तर कुठे बागे आसरा घेताना दिसले.
#WATCH | Uttar Pradesh: People rush out of their houses to open spaces as several parts of north India experience strong tremors of earthquake.
Visuals from Golf City, Noida. pic.twitter.com/Y5GmK1Ck2S
— ANI (@ANI) March 21, 2023
भूकंपानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि ते घर सोडून बाहेर पडले. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 मोजण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू उत्तर अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता.
Delhi University North campus#earthquake #delhincrearthquack #earthquake #DelhiNCR#भूकंप pic.twitter.com/FxBmzd0cez
— ABHISHEK KUMAR YADAV (@abhishek9541340) March 21, 2023
Delhi University North campus#earthquake #delhincrearthquack #earthquake #DelhiNCR#भूकंप pic.twitter.com/laTo8Y6ks2
— Subhash Suman (@Subha7Suman) March 21, 2023
या भूकंपाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक ठिकाणी भिंती तडे गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणंय. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीक घरातून बाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात आले.
Insanely scary #earthquake at Delhi, running down 11 floors while the building swung. #Gurgaon pic.twitter.com/cugvMduQgQ
— Aparajita Bahadur (@foot_loose_apra) March 21, 2023