Delhi Ncr Earthquake: राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली आहे. उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरीक भयभित झाले (Earthquake In Delhi ). बराच काळ भूकंपाचे हादरे जाणवले. श्रीनगर, गाझियाबादमध्येही भूकंपाचे धक्के बसले.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे नागरिक भयभित झाले.
या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओ मध्ये घरातील पंखे, लाईट आणि इतर वस्तू हलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी भिंती तडे गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीक घरातून बाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात आले.