लंडन : जगात कोरोनाची (Coronavirus) चौथी लाट आली आहे. या चौथ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीन आणि दक्षिण कोरियात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आता तर ओमायक्रॉन आणि डेल्टा यापासून डेल्टाक्रोन (Deltacron) हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. याचा पहिला रुग्ण इंग्लंडमध्ये सापडला आहे. त्यामुळे पुन्हा धोका वाढला आहे.
भारतात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. कोविडचा एक नवीन प्रकार देशात दाखल झाला आहे. शास्त्रज्ञांनी त्याला डेल्टाक्रॉन असे नाव दिले आहे. डेल्टाक्रोनच्या अनेक राज्यांमध्ये रुग्ण सापडले आहेत. अनेक राज्यांमध्ये टेस्ट केल्या जात आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा एक सुपर-म्युटंट व्हायरस आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव BA.1 + B.1.617.2 ठेवले आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला एक संकरित स्ट्रेन आहे, जो सायप्रसच्या काही संशोधकांनी प्रथम शोधला होता.
डेल्टाक्रॉनचा पहिला रुग्ण फेब्रुवारीमध्ये सापडला. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले. पण आता ब्रिटनमध्ये याचे रुग्ण समोर येत आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोना विषाणूचा संकरित प्रकार आहे जो डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरिएंटपासून तयार झाला आहे.
डेल्टाक्रोनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये डोकेदुखी आणि तीव्र ताप ही लक्षणे दिसतात. रुग्णांनाही घाम येतो. घसा खवखवणे कायम राहतो. शरीर नेहमी थकल्यासारखे वाटते आणि अस्वस्थ राहते. वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता देखील प्रभावित होते. अशा परिस्थितीत रुग्णांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताच्या कोविड जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) आणि GSAID ने संकेत दिलेत की देशात 568 रुग्णांची टेस्ट करण्यात येत आहे. कर्नाटकात, डेल्टाक्रॉनचे (Deltacron) संशयित 221 रुग्ण सापडले आहेत. हा एक नवीन हॉटस्पॉट असल्याचे दिसते. तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32 आणि तेलंगणात 25 आणि नवी दिल्लीत 20 रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे.
डेल्टाक्रोन व्हेरिएंटवर अजूनही अभ्यास सुरू आहे. वृत्तानुसार, जानेवारी 2022 मध्ये फ्रान्समध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि पहिला रुग्ण आढळून आला. फेब्रुवारीमध्ये ब्रिटनमध्येही याची प्रकरणे नोंदवली गेली होती. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की डेल्टा आणि ओमिक्रॉनपासून तयार झालेल्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे. डब्ल्यूएचओ शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हटले आहे की, SARSCov2 चे ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकार एकत्र पसरण्याची शक्यता आहे. हा प्रकार वेगाने पसरतो.