Andaman Nicobar Trip: आयआरसीटीसी (IRCTC) नेहमीच आपल्या प्रवाशांसाठी चांगल्यात चांगले पॅकेज घेऊत येत असते. सामान्य लोकांना ही त्या पॅकेजचा वापर करता येतो. हे पॅकेज आकर्षक असतात. IRCTC नेहमीच बजेट फ्रेंडली टूर पॅकेजेस आणते, जेणेकरून सर्व वर्गातील लोक त्यांचा लाभ घेऊ शकतील आणि याद्वारे ते अनेक सुंदर ठिकाणे पाहण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील आणि अधिकाधिक लोकांना धार्मिक स्थळे पाहता येतील. याच क्रमाने, यावेळी IRCTC ने अंदमान आणि निकोबारला भेट देण्यासाठी टूर पॅकेज आणले आहे.
अनेक लोकांना अंदमान निकोबारला भेट द्यायची असते, परंतु काहीवेळा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे आपल्यासा असे टूर प्लॅन करता येत नाहीत. अशा परिस्थितीत, अंदमान निकोबारला भेट देण्याचे तुमचे स्वप्न IRCTC च्या या सर्वोत्तम टूर पॅकेजद्वारे पूर्ण होऊ शकते. जाणून घ्या काय आहे या टूर पॅकेजमध्ये...(do you want to go for a picnic Know about special packages of irctc nz)
IRCTC च्या या सर्वोत्कृष्ट टूर पॅकेजचे नाव आहे 'Mesmerizing अंदमान'. 'देखो अपना देश' आणि ७५ वा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवांतर्गत याची सुरुवात झाली आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक आयलंड आणि बाराटॉन्ग बेट यांसारखी सुंदर ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल.
या टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला अंदमान आणि निकोबारला पूर्ण 5 दिवस / 6 रात्री भेट देण्याची संधी मिळेल. हा प्रवास उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून सुरू होणार आहे. 4 नोव्हेंबर, 16 डिसेंबर 2022, 5 जानेवारी आणि 23 मार्च 2023 रोजी लखनौ ते अंदमानसाठी फ्लाइट आहे.
या टूर पॅकेज अंतर्गत नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था IRCTC कडून केली जाईल. अंदमानला जाण्यासाठी बस आणि निवासासाठी हॉटेलचीही सोय आहे.
IRCTC च्या पॅकेज अंतर्गत एका व्यक्तीला 72,280 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, 2 व्यक्तींसाठी 57,840 रुपये आणि 3 व्यक्तींसाठी केवळ 55,870 रुपये दिले जातील. मुलांना सोबत घ्यायचे असेल तर त्यांचे भाडे वेगळे द्यावे लागेल.
या टूर पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या मोबाईल क्रमांकांवर कॉल करू शकता. मोबाईल क्रमांक- 8287930908, 8287930909