नवी दिल्ली : भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. एकमेकांना ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सोसायटी अशा सर्व ठिकाणी झेंडावदन केले जात आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले.
याच औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे डोनाल्ट ट्रम्प यांनी फोन केल्याचे वृत्त आहे. डोनाल्ट यांनी ७१व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे यासंबंधी ट्विट करुन माहिती दिली आणि डोनाल्ट यांच्याप्रती आभारही व्यक्त केले.
Appreciate the warm felicitations from @POTUS, who called this evening to convey Independence Day greetings. Thank you @realDonaldTrump.
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2017
ट्रम्प यांनी अनेकदा हिंदुस्थान आपला चांगला मित्र असल्याचे सांगितले आहे. मोदी हे हिंदुस्थानचे ताकदवान पंतप्रधान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोकलाम सिमेवरुन भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेशी मैत्री आणि राष्ट्राध्यक्षांचा शुभेच्छांचा संदेश याला महत्त्व प्राप्त झाले आहे.