मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती

Updated: Jun 22, 2018, 09:59 PM IST

भोपाळ : मध्यप्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यात पावसाने अजुनही हजेरी न लावल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्य़ासाठी वेगवेगळ्य़ा उपाययोजना राबवल्या जात आहेत. मध्यप्रदेशच्या महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री ललिता यादव यांनी तर पाऊस पडावा, यासाठी अजबच गोष्ट केली आहे. दमदार पाऊस व्हावा यासाठी यादव यांनी फुला देवीच्या मंदिरात चक्क बेडकांचं लग्न लावलं. या लग्नाच्या वेळी अगदी विधिवत सर्व सोहळे पारंपारिक पद्धतीने पार पाडण्यात आले. बेडकांचे लग्न लावून दिल्यामुळे जोमदार पाऊस पडतो अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.