नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी संध्याकाळी भूंकपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपांचं केंद्र हरियाणातील सोनीपत असल्याचं बोललं जात आहे. भूकंपची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूवैज्ञानिकांनी म्हटलं की, रविवार संध्याकाळी 3.37 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती अजून समोर आलेली नाही.
Earthquake of magnitude 4.0 hit Sonipat in Haryana at 3:37 pm, tremors were felt in adjoining areas of Delhi NCR https://t.co/vZVf9sHv3Q
— ANI (@ANI) July 1, 2018