दलदलीतून रेस्क्यू केल्यानंतर हत्तीनं अनोख्या पद्धतीनं मानले आभार, व्हिडीओ

हत्तीला वाचवण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न 

Updated: May 20, 2021, 01:51 PM IST
दलदलीतून रेस्क्यू केल्यानंतर हत्तीनं अनोख्या पद्धतीनं मानले आभार, व्हिडीओ title=

मुंबई : विशालकाय असा हत्ती जर चिखलात अडकला तर त्याला बाहेर काढणं किती कठिण आहे याची कल्पनाच केलेली बरी. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी एका हत्तीला रेस्क्यू करत आहेत. 

व्हायरल व्हिडिओत, एक हत्ती चिखलात अडकला होता. ही घटना कर्नाटकमधील कुर्गमधील आहे. हत्ती एका चिखलाच्या खड्यात पडला त्याला बाहेर काढणं कठीण होतं. अशा वेळी जेसीबीच्या सहाय्याने हत्तीला बाहेर येण्यासाठी थोडा रस्ता करून दिला. 

मात्र हत्ती सारखा चिखलात पडत होता. अशावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीने त्याला सपोर्ट देण्यात आला. यानंतर हत्ती बाहेर आला. तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. 

मात्र बाहेर आल्यावर हत्तीने जे केलं त्याने साऱ्यांचच मन जिंकलं. हत्तीने जेसीबीला आपलं डोकं लावलं. आणि तो त्यासोबत लडीवारपणे खेळू लागला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांना एक फटाका लावून त्याला पुन्हा जंगलात पाठवलं.

आसामच्या नौगावमध्ये १८ हत्ती मृत अवस्थेत आढळलेत. वीज कोसळल्यानं या हत्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन वेगवेगळ्या भागांत अनेक हत्ती मृतावस्थेत सापडलेत. यातील एका जागेवर चार तर दुसऱ्या जागेवर १४ हत्ती मृतावस्थेत आढळले.