नवी दिल्ली : हिंदू विभक्त कुटुंबातील कोणताही सदस्य संयुक्त परिवारातील कोणत्याही संपत्तीवर दावा करत असेल तर त्याला सिद्ध करावे लागेल की ही संपत्ती त्याने स्वतः कमावली आहे, असा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने हा निर्देश दिला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने योग्य ठरविले. यात एका संपत्तीला संयुक्त परिवाराची संपत्ती घोषीत केली होती. संयुक्त परिवाराच्या काही सदस्यांनी या संपत्तीवर दावा केला होता त्या दाव्याला अमान्य केले. दाव्यात एका शेतजमीनीला स्वअर्जित संपत्ती सांगून परिवारातील इतरांचा त्याच्यावर अधिकार नाही.
सुप्रीम कोर्टाने म्हटले की हिंदू कुटुंब कायद्यानुसार कायदेशीर असे मानले जाते की प्रत्येक हिंदू कुटुंब जेवण, पूजा आणि संपदेच्याबाबती संयुक्त परिवार आहे. यात वाटणीच्या कोणत्याही पुराव्याच्या अभाव असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई कुटुंबाला लागू होते.