चेन्नई : आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२८ वाजता, भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन रॉकेटमधून (PSLV) अवघ्या २७ मिनिटांत १४ उपग्रह अवकाशात पाठवले जाणार आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आपल्या PSLV-XLसह १४ उपग्रह अवकाशात पाठवेल. तेथे प्रामुख्याने भारताचे १,६२५ किलोग्राम कार्टोसॅट -३ उपग्रह असेल तर अमेरिकेचे १३ नॅनो उपग्रह देखील पाठवले जाणार आहेत.
पाच वर्षांपासून काम करणाऱ्या कार्टोसॅट -३ या उपग्रहाला पीएसएलव्ही रॉकेट सर्वात आधी केवळ १७ मिनिटांत कक्षेत स्थापन करणार असल्याची माहिती मिळत आहे.
#ISRO #PSLV #Cartosat3
The launch of PSLV-C47 carrying Cartosat-3 scheduled on November 25, 2019 at 0928 hrs is rescheduled to launch on November 27, 2019 at 0928 hrs from Second launch pad of Satish Dhawan Space Centre SHAR, Sriharikota.Stay tuned for more updates..
— ISRO (@isro) November 21, 2019
#ISRO #PSLV-C47 set to launch #Cartosat3 and 13 Nanosatellites of USA from Satish Dhawan Space Centre in Sriharikota at 0928 Hrs IST on Nov 25, 2019, subject to weather conditions.
Updates will continue. pic.twitter.com/RbtjHLlEfZ— ISRO (@isro) November 19, 2019
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, कार्टोसॅट -३ हा तिसऱ्या पिढीतील प्रगत उपग्रह आहे. याची हाय रिजोल्यूशन इमेजिंगची क्षमता आहे. नागरी नियोजन, ग्रामीण स्रोतांचा विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास, किनारपट्टीवरील जमीन वापर आणि इतर मागण्यांसाठी हा उपग्रह छायाचित्र घेण्यास सक्षम असेल.