FSSAI advisory: हल्ली परिधान करण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या सर्व वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड वाढलाय. ऑनलाईन दाखविण्यात आलेल्या जाहिरातींना भुलून अनेक लहान मुलेही खाण्याच्या वस्तू मागवू लागली आहेत. या सर्वात अन्न सुरक्षा प्रक्रियेवर नियत्रंण असणे गरजेचे भासते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने यासंदर्भात महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार उत्पादकांना हेल्थ ड्रिंक विकताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यांना त्यांच्या वेबसाइटवर विकल्या जाणाऱ्या खाद्य उत्पादनांचे योग्य वर्गीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.प्रॉपरायटरी फूड अंतर्गत परवानाकृत खाद्य उत्पादनांना डेअरी-आधारित पेय मिश्रण किंवा तृणधान्य-आधारित पेय मिश्रण किंवा माल्ट-आधारित पेय मिश्रणाच्या जवळच्या श्रेणी अंतर्गत विकले जात आहे. तुम्ही ईकॉमर्स वेबसाइटवर 'हेल्थ ड्रिंक्स'सारखे भासले जाणारे एनर्जी ड्रिंक्स विकले जाताना पाहिले असेल. या सर्वाचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अशा उत्पादनांबाबत ग्राहकांना जागृकता असणे आवश्यक असते, म्हणून हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
ई-कॉमर्स वेबसाइटवर हेल्थ ड्रिंक, एनर्जी ड्रिंक यांच्याबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. कंपन्यांकडून कळत नकळत ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतात.हेल्थ ड्रिंक' हा शब्द FSS कायदा 2006 किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियम/नियमांनुसार कुठेही परिभाषित किंवा प्रमाणित केलेला नाही. याचा फायदा अनेक ईकॉमर्स कंपन्या घेत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर FSSAI ने सर्व ई-कॉमर्स FBOsसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यासाठी महत्वाचा कायदा आहे.'हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका' असे FSSAI ने आपल्या निर्देशामध्ये म्हटलंय.
ई-कॉमर्स वेबसाइटने हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यातील चुकीचे वर्गीकरण त्वरित दुरुस्त करावे. अशी पेये त्यांच्या वेबसाइटवरील 'हेल्थ ड्रिंक्स/एनर्जी ड्रिंक्स' या श्रेणीतून काढून टाकावी किंवा डी-लिंक करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अशा उत्पादनांना विद्यमान कायद्यानुसार देण्यात केलेल्या योग्य श्रेणीमध्ये ठेवा, 'प्रोपरायटरी खाद्यपदार्थ' हे अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न उत्पादन मानके आणि अन्न मिश्रित पदार्थ) नियमनमध्ये प्रमाणित नसणारे खाद्यपदार्थ आहेत, असेही सांगण्यात आले आहे
उत्पादनांचे स्वरूप आणि कार्यात्मक गुणधर्मांबद्दल स्पष्टता आणि पारदर्शकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच यामुळे ग्राहकांची दिशाभूल न होता त्यांना योग्य आणि हवी ती निवड करता येणार आहे, असे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.