मुंबई : आता FASTag वापरणे ही काळाची गरज झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानुसार त्यांनी आता बहुतेक सगळ्याच राज्यांमध्ये FASTag सक्तीचे केले आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला कोणताही टोलनाका पार करताना जास्त काळ थांबण्याची गरज नाही. FASTag याला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चालविते.
त्यामुळे सगळ्यांना आता आपल्या वाहनांना FASTag लावावेच लागेल. हे FASTag थेट प्रीपेड किंवा बचत खात्याशी कनेक्ट केले जाऊ शकते. येथे आम्ही आपल्याला काही उत्कृष्ट ऑफरंबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे FASTag रिचार्ज करताना आपल्याला चांगली कॅशबॅक मिळू शकेल. आपण Amazon अॅप, एचडीएफसी बँक कडून रिचार्ज करून 75 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
Amazon ने आपल्या रिचार्ज सेक्शनमध्ये FASTag रिचार्ज सुरू केले आहे, जिथे फ्लॅट कॅशबॅक ऑफर केला जात आहे. Amazon वरुन प्रथमच FASTag चा रिचार्ज केल्यावर 50 रुपये कॅशबॅक देण्यात येत आहे. या ऑफरची किमान रिचार्ज किंमत 100 रुपये आहे. ही ऑफर केवळ Amazon अॅपद्वारे FASTag रिचार्ज केल्यावर वैध आहे.
आपण Amazon वरून FASTag कसे रिचार्ज करू शकता ते जाणून घ्या.
1. Amazon अॅप डाउनलोड करा आणि अॅप उघडा.
2. Amazon पे सेक्शनमध्ये जा.
3. ‘FASTag Recharge’ वर क्लिक करा (जर आपल्याला FASTag रिचार्ज विभाग दिसत नसेल तर खाली स्क्रोल करा आणि FASTag ऑफर बॅनरवर क्लिक करा> Recharge Now वर क्लिक करा).
4. आपला वाहन क्रमांक प्रविष्ट करा.
5. आपली FASTag साठी वापरली जाणारी बँक निवडा.
6. आपली रक्कम प्रविष्ट करा आणि पुढे जाण्यासाठी रिचार्ज फास्टॅगवर क्लिक करा (किमान 100 रुपये रिचार्ज करा)
7. अॅमेझॉन पे बॅलन्समध्ये तुमची अमाउंट आणि फ्लॅट 50 रुपये कॅशबॅक मिळवा.
8. ही ऑफर 1 FASTag Recharge वर Amazon वर वैध आहे.
तुम्ही एचडीएफसी बँकेच्या PayZapp अॅपद्वारे फास्टॅग रिचार्ज करू शकतात. त्याअंतर्गत बँक 10 टक्के म्हणजे 75 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. आपण HDFC Bank च्या FASTag वॉलेटने रिचार्ज कसे करू शकता ते जाणून घ्या.
HDFC बँकेचे NETC FASTag वापरणे अगदी सोपे आहे. फ़ास्ट रिचार्ज रिचार्जसाठी खाली दिलेले स्टेप्स ला फॅालो करा
1. PayZapp द्वारे पेमेंट करण्यासाठी Login > Recharge / BillPay > Utility / BillPay > FASTag > HDFC Bank FASTag > वर जाऊन डीटेल्स भरा आणि रिचार्ज करा.
2. UPI मार्फत रिचार्ज करण्यासाठी, कोणताही UPI अॅप्लिकेशन उघडा> Select FASTag Recharge > HDFC Bank FASTag > वर जाऊन डीटेल्स भरा आणि रिचार्ज करा.
3. HDFC बँक मोबाइल बँकिंगद्वारे रिचार्ज करण्यासाठी Pay by UPI ID वर क्लिक करा आणि VPA टाका. आता HDFC Bank NETC FASTag Recharge चा VPA टाका (उदा. netc.MH12AB1234@hdfcbank) आता Login > Pay > Add Biller > FASTag > Add Details > Pay from > Recharge निवडून प्रक्रिया पूर्ण करा.