नवी दिल्ली : शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशीही सल्लामसलत केली. ओल्या दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा पवारांनी आग्रह केला आहे. पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या ओल्या दुष्काळाची माहिती दिली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी देण्याची मागणी केली.
This year the returning monsoon devastated almost every standing crop in major parts of Maharashtra. I brought to notice this alarming situation to the kind attention of Hon. PM.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 20, 2019
यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलवून घेतले. तसंच कर्जमाफीबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी सल्लामसलत केली. यावेळी पवारांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अजूनही मिळालेली नसल्याचे पंतप्रधानांना लक्षात आणून दिले. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचे नमूद केले. यावेळी पवारांनी मोदींना पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं निमंत्रण दिले.
Met @PMOIndia Shri. Narendra Modi in Parliament today to discuss the issues of farmers in Maharashtra. This year the seasonal rainfall has created Havoc engulfing 325 talukas of Maharashtra causing heavy damage of crops over 54.22 lakh hectares of area. pic.twitter.com/90Nt7ZlWGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 20, 2019
दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल ४५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा न झाल्याची माहिती पवारांनी दिलीय. मात्र पवार मोदी भेट सुरू असताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहाही या बैठकीला आल्याचं समजतंय. त्यामुळे तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता लागली आहे. पवारांच्या भेटीनंतर मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पवारांच्या भेटीत दुष्काळाशिवाय आणखी काय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले आहे.