GK : 'हे' शहर फक्त 24 तासांसाठी बनले होते भारताची राजधानी; शहराचे नाव ऐकून आश्चर्यचकित व्हाल

Prayagraj : भारतातील एक शहर फक्त एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते. जाणून घेऊया हे शहर कोणते. 

वनिता कांबळे | Updated: Dec 28, 2024, 10:42 PM IST
GK : 'हे' शहर फक्त 24 तासांसाठी बनले होते भारताची राजधानी; शहराचे नाव ऐकून आश्चर्यचकित व्हाल title=

One Day Capital Of India: मुंबई हे शहर आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. तर, भारताची राजधानी ही दिल्ली आहे. मात्र, एक शहर फक्त दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते. जाणून घेऊया हे शहर कोणते आणि हे शहर फक्त दिवसासाठी का बनले होते भारताची राजधानी.

हे देखील वाचा... भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात; एकावेळी उभी राहतील 350 विमाने

भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील प्रत्येक राज्यांची वेगळी राजधानी आहेत.  आंध्र प्रदेश - अमरावती, अरुणाचल प्रदेश - ईटानगर, असम - दिसपूर, बिहार - पटना, छत्तीसगढ़ - रायपुर, गोवा - पणजी, गुजरात - गांधीनगर, हरियाणा - चंडीगढ़, हिमाचल प्रदेश - शिमला, झारखंड - रांची, कर्नाटक - बंगलौर, केरल - तिरूवनंतपुरम, मध्य प्रदेश - भोपाल, महाराष्ट्र - मुंबई, मणिपुर - इंफ़ाल, मेघालय - शिलांग, मिजोरम - आइज़ोल, नागालैंड - कोहिमा, ओडिशा - भुवनेश्वर, पंजाब - चंडीगढ़, राजस्थान - जयपुर, सिक्किम - गंगटोक, तमिलनाडु - चेन्नई, तेलंगाना - हैदराबाद, त्रिपुरा - अगरतला अशी भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानींची नावे आहेत. 

हे देखील वाचा... 70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे! कुटुंबातील 700 जणांची नावं लक्षात राहत नसल्याने बनवला रजिस्टर

दिल्ली ही भारताची कायस्वरुपी राजधानी नाही. पाटलिपुत्र, कोलकाता सारख्या अनेक शहरांनी देशाची राजधानी होण्याचा मान मिळवला. मात्र, अलाहाबाद आत्ताचे प्रयागराज हे शहर फक्त 24 तास म्हणजेच एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते. इ.स. 1858 मध्ये अलाहाबादला एका दिवसासाठी भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. ज्यावेळेस अलाहाबाद हे शहर भारताची राजधानी बनले होते. त्या वेळी ही वायव्य प्रांताची ही राजधानी होती. ब्रिटिशांनी तेथे उच्च न्यायालय आणि अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली.

हे देखील वाचा... जगातील एकमेव फळ 'जे' विमानात नेता येत नाही; 99 टक्के उत्तर माहित नाही

आता प्रयागराज म्हणून ओळखल्या अलाहाबाद शहराची स्थापना 1583 मध्ये मुघल सम्राट अकबराने केली होती. अकबराने त्याचे नाव अलाहाबाद असे ठेवले. मुघल साम्राज्याच्या काळात ही एक प्रांतीय राजधानी बनली होती. 1599 ते 1604 पर्यंत अलाहाबाद सम्राट जहांगीरचे मुख्यालय देखील होते. मोगलांच्या पतनानंतर 1801  मध्ये हे शहर इंग्रजांच्या ताब्यात गेले. 1857 च्या मध्यात हे शहर  ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय बंडाचे केंद्र होते आणि नेहरू घराण्याचे निवासस्थान आहे. 1 नोव्हेंबर 1858 रोजी प्रयागराजमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवण्याची घोषणा करण्यात आली. या दिवशी अलाहाबाद  येथे एक दिवसीय शाही दरबार आयोजित करण्यात आला होता. या दरबारात राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनामा वाचण्यात आला. त्यावेळी अलाहाबाद हे  एका दिवसासाठी भारताची राजधानी बनली होती.