रणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद?

रणवीर अलाहाबादिया प्रसिद्ध युट्यूबर ज्याचा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे.आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. कायद्यात अशा गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊयात. 

Intern | Updated: Feb 11, 2025, 03:56 PM IST
रणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद? title=

रणवीर अलाहाबादिया प्रसिद्ध युट्यूबर असून, सध्या आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असून, टीकेचा धनी ठरला आहे. दरम्यान या टीकेनंतर आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. पोलिसांनी जिथे कार्यक्रम झाला तिथे जाऊन अनकट फुटेजची मागणी केली असून, समन्सही बजावलं आहे. दरम्यान कायद्यात अशा गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊयात. 

रणवीर अलाहाबादियाचे वादग्रस्त वर्तन आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा अपशब्द वापरणे, यामुळे त्याला भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (Information Technology Act) काही कलमांनुसार शिक्षा होऊ शकते. त्यासंबंधी सविस्तरपणे जाणून घ्या. 

1. कलम 294 
सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणं किंवा अश्लील शब्दांचा वापर करणे हा गुन्हा मानला जातो. या कलमाअंतर्गत व्यक्तीस तीन महिन्यांचा कारावास आणि 1000 रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे जर रणवीरवरील आरोप सिद्ध झाला तर त्याला ही शिक्षा भोगावी लागू शकते. 

2. माहिती तंत्रज्ञान कायदा - कलम 67
माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती इंटरनेटवर किंवा अन्य डिजिटल माध्यमांद्वारे अश्लील सामग्री प्रसारित करतो, तर त्यावर या कलमाअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये तीन वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये, या कलमाअंतर्गत 5 वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपये दंड देखील लागू होऊ शकतो.

3. माहिती तंत्रज्ञान कायदा - कलम 67A
या कलमाअंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने अश्लील सामग्री जशी की नग्नता किंवा अश्लीलतेची सामग्री सार्वजनिकपणे प्रसारित केली, तर त्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये 5 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये 7 वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड देखील होऊ शकतो.

रणवीर अलाहाबादियाला वादग्रस्त वर्तनासाठी विविध कलमांनुसार कठोर शिक्षा होऊ शकतात. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अपशब्द वापरणे, अश्लील सामग्री प्रसारित करणे, आणि इंटरनेटवर अश्लीलतेचा प्रसार करणे यावर आधारित शिक्षाअंतर्गत त्याला कारावास आणि दंड होऊ शकतात. यामध्ये जामीन मिळवतानाही अडचणी येऊ शकतात.